मुंबई-गोवा महामार्ग बाबत झालेल्या आंदोलनाची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घेतली दखल

मुंबई-गोवा महामार्ग बाबत झालेल्या आंदोलनाची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी घेतली दखल

Kokan Live Digital News:

रुबिन मुजावर

मुंबई-गोवा महामार्ग बाबत झालेल्या आंदोलनाचे पडसाद केंद्रामध्ये उमटले असून केंद्रीय रस्ते  व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या बाबत दखल घेतली असून येत्या 2023 मे पर्यंत मुंबई गोवा महामार्ग 66 शंभर टक्के पूर्ण होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे


 याबाबत  लांजा येथे आलेले राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत असलेले पत्र आपल्या सोबत आणले होते ते त्यांनी सर्वांसमोर वाचून दाखवले यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत ,आमदार राजन साळवी, लांजातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, मोहम्मद भाई रखांगी, लांजा शहरातील मानकरी सर्व संबंधित कार्यालयीन विभागाचे अधिकारी पोलीस खाते विभागीय प्रान्त आहेत साहेब व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या वेळी खास करून केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून मुख्य अधिकारी देखील यावेळी  उपस्थित होते त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आता काही महिन्यातच पूर्ण होण्याची चिन्ह दिसत आहेत तसेच लांजा मध्ये झालेल्या या आंदोलनाला यश आल्यामुळे लांजा व्यापारी संघटना व सर्व ग्रामस्थांतर्फे आभार मानण्यात आले आहेत

 हे देखील जाहीर झाले असले तरी लांजा शहरातील चार ते पाच किलोमीटरचा रस्ता येत्या 10 फेब्रुवारी पूर्वी करण्यात येईल असे देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहे 
त्यामुळे लांजा वासियांची व व्यापारी छोटे-मोठे व्यवसाय करणारे रस्त्यालगतचे सर्व दुकानदार यांची धुळीपासून सुटका होणार आहे व  पादचार्‍यांना देखील सुरळीत रस्त्यावर चालता येईल असेच चित्र येत्या काही दिवसात दिसणार असल्याचं समजतंय