22 व 23 जानेवारीला कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती
कोकण रेल्वे मार्गावरील 23 जानेवारी ची तेजस एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे मध्य रेल्वेच्या अखत्यारीत ठाणे दिवा रेल्वे लाईनवर अबग्रेट च्या कामांमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्सप्रेस अप व डाऊन दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आले आहेत
रेल्वेच्या या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आणखी सहा एक्सप्रेस गाड्यांच्यावर परिणाम झाला आहे याबाबत रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार 21 जानेवारी रोजी प्रवास सुरू होणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस गाडीचा प्रवास पनवेल स्थानकात संपणार आहे तसेच 22 जानेवारी रोजी प्रवास सुरू होणारी गाडी मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस पनवेल स्थानकात शोर्ट टर्मिनेट केली जाईल त्याशिवाय 22 जानेवारी जची मडगाव मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस देखील सीएसटी ते पनवेल पर्यंत धावणार आहे त्याचबरोबर 23 रोजी ची नेत्रवती डाऊन एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनल ऐवजी पनवेल येथून तिरुवनंतपुरम ला सुटणार आहे 23 रोजी सुटणाऱ्या मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस मडगावपर्यंत धावणार मांडवी एक्सप्रेस पनवेल येथून सुटणार आहे यामुळे 22 व 23 जानेवारी रोजी कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन मध्य तसेच कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे
Bni salah transfer