कासवांच्या साह्याने समुद्रामधील जिवांचा होणार उलगडा

कासवांच्या साह्याने समुद्रामधील जिवांचा होणार उलगडा
सॅटॅलाइट ट्रान्समिशन लावलेला कासव छायाचित्रात दिसत आहे (फोटो मुजमिल जैतापकर दापोली)

मुजम्मिल जैतापकर रिपोर्ट

भारतातील पष्चिम किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर प्रयोग यषस्वी झाला असून , आता ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या स्थलांतरांचा अभ्यास होण्यास मदत होणार आहे .
मँग्रोव्ह फाऊंडेशन व भारतीय वन्यजीव संस्थान मार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास व आंजर्ले या दोन ठिकाणी हा उपक्रंम  यशस्वी झाला आहे .

भारतीतील पष्चिम किनारपट्टीवर येणा-या ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातींना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवार दि. 25 जानेवारी 2022 रोजी या उपक्रमातील पहिल्या दोन कांसविनीना हे उपकरण बसवण्यात पथकाला यश आले आहे. कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणा-या सागरी कासवांच्या अभ्यासाकरिता हे यंत्र बसवण्यात आले वेळास  व आंजर्ले येथील एक  अशा दोना मादी कासवांना अशा  प्रकारचे उपकरण दि.24 जानेवारी रोजी मध्यरात्री दोन कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच समुद्री कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास करण्यात येत आहे. हा अभ्यासप्रकल्प कांदळवन कक्ष, मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थान मार्फत (डब्लूआयआय) राबविण्यात आला आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय मँग्रोव्ह फाऊंडेशनश्ने घेतला. याअंतर्गत पाच मादी कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात येणार आहेत. यामधील दोन कासवांना मंगळवारी मध्यरात्री सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले. मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनार्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले मादी कासवाला डब्लूआयआयचे शास्त्रज्ञ डॉ.आर.सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शना अंतर्गत सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले.