राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेवतीने नवनिर्वाचीत नगरसेवकांचा जाहीर सत्कार
दापोली (मुज्जमिल जैतापकर)
मंडणगड: जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ करत मंडणगड शहरास विकासाचे वाटेवर पुढे नेण्याचे काम नवीन नगरसेवक सत्तेच्या माध्यमातून करतील असा विश्वास मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंडणगड शहरातील कार्यालयात दि. 27 जानेवारी रोजी नवनिर्वाचीत नगरसेवकांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
या कार्यक्रमास नगरसेवक सुभाष सापटे, वैभव कोकाटे, प्रियांका लेंडे, समृध्दी शिगवण, मुकेश तलार, मनिषा हातमकर, राजेश्री सापटे, रेशमा मर्चंडे, सोनल बेर्डे, तालुका अध्यक्ष मुझ्झफर मुकादाम, भाई पोस्टुरे, रमेश दळवी, प्रकाश शिगवण, नितीन म्हामुणकर, प्रमोद जाधव, दिनेश लेंडे, राहूल कोकाटे लुकमान चिखलकर ..तालुका महिला उपाध्यक्ष रेश्मा जुवले यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थित लाभली, यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली असून जनतेने ठेवलेला विश्वास आपण विकासकामाच्या रुपाने खरा ठरवावा. यावेळी बोलताना जेष्ठ नेेते रमेश दळवी यांनी अपक्ष उमेदवारांनी मिळविलेल्या यशाचे कौतूक करताना गट स्थापनेसाठी पक्षावर विश्वास टाकत केलेल्या सहकार्याचा उल्लेख करताना आगामी काळात सर्व नगरसेवकांनी एकत्रीतपणे काम प्रशासनाचे सहकार्याने विकासाच्या विविध योजना राबवाव्यात, पक्षातील जेष्ठ मंडळी शासन दरबारी आपल्या सोबत निधीसाठी सोबत राहतील व त्यासाठी शक्य ती सर्व मदत करतील असे अश्वासीत केले. जेष्ठ नेत भाई पोस्टुरे यांनी प्रशासकीय कारभारावरील नगरसेवकांची पकड अधिक घट्ट असण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी सर्व नगरसेवकांचा उपस्थित कार्यकर्त्यांचेवतीने सत्कार करण्यात आला.
Bni salah transfer