आश्रम शाळेतील मुलांसोबत साजरा केला आपला स्वतःचा वाढदिवस

आश्रम शाळेतील मुलांसोबत साजरा केला आपला स्वतःचा वाढदिवस

उद्योजक सचिन माजळकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत


     माजळ गावचे सुपुत्र, तालुक्यातील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते , लांजातील युवा उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व सचिनशेठ माजळकर यांनी आपला वाढदिवस हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी  संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जावडे येथे विद्यार्थ्यांसोबत साजरा करून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. 


    यावेळी सचिन माजळकर आणि त्यांच्या परिवाराकडून आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांना भोजनदान करण्यात आले. यावेळी वाकेड गावचे सरपंच संदीप सावंत, वेरवली गावचे सरपंच सुरज कुरतडकर, जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ, शिवप्रसाद  ताटके, सौ. सुप्रिया माजळकर, जावडे गावचे शाखाप्रमुख रघुनाथ नामये, सुबोध माजळकर, सुमित माजळकर ग्रामस्थ सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.