आमदार भास्कर जाधव यांनी ईतिहास कालीन तलाव संवर्धनाचा आराखडा तयार केला
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत रामपूर (ता. चिपळूण) येथे असलेले पुरातन तलाव संवर्धन करून हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरावे यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुंबईहून खास या कामातील पर्यावरण तज्ञ सल्लागार श्री. नीलेश पवार यांना बोलावून स्थानिक ग्रामस्थांसमवेत तलावाची पाहणी केली आणि तलाव संवर्धनाचा आराखडा तयार करा, अशी सूचना केली. या कामासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव, पंचायत समिती सदस्या सौ. अनुजा चव्हाण, माजी सभापती जितेंद्र चव्हाण, सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी या कामाला आनंदाने सहमती दर्शवली.
Bni salah transfer