पावसाचा हाहाकार घरावर कोसळली दरड लाखोंचे नुकसान
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसा पासून पडत असलेल्या पावसाने मंगळवारी उग्र रूप धारण केले दोन दिवस तुफान पावसाने खेड तालुक्याला झोडपून काढले . तालुक्यातील दाभीळ येथे एका घरावर दरड कोसळून लाखोचंची हानी झाली तर दरडी मुळे कार व दुचाकी अडकून पडल्या . घडलेल्या दुर्घटने मध्ये एका २० वर्षीय युवती थोडक्यात बचावली त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. हि घटना मंगळवारी दिनांक पाच जुलै दुपारच्या सुमारास घडली
गेल्या दोन दिवसा पासून पावसाचा कहर सुरु आहे मंगळवारी देखील पावसाचा जोर कायम राहिल्याने दाभीळ येथील संतोष राठोड यांच्या मालकीचे असलेल्या घरावर दुपारच्या सुमारास अचानक घरानजीक असलेली दरड कोसळून घर या दरडी खाली गाडले गेले त्यामध्ये घरा समोर उभी असलेली एक कार व दुचाकी दरडी खाली अडकून पडल्या . या घरा मध्ये असलेली २० वर्षीय युवती स्नेहा राठोड हिने दरड कोसळत असल्याचे तिच्या लक्षात आले असता तिने घरा बाहेर धाव घेतल्याने तिचा जीव वाचला
दरम्यान, या घटने मध्ये सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी घर दरडी मध्ये पूर्णता उध्वस्त झाल्याने लाखो रुपयांची हानी होत राठोड कुटुंबीय बेघर झाले आहे या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटना स्थळी दाखल होत मदत कार्य केले असून प्रशासन देखील या ठिकाणी पोहोचले आहे
Bni salah transfer