मुंबईतून कोकणात येण्याचे अंतर झाले कमी । कशेडी भोगदा हलक्या वाहनांना खुला

मुंबईतून कोकणात येण्याचे अंतर झाले कमी । कशेडी भोगदा हलक्या वाहनांना खुला
ट्रायल बेसवर हलक्या वाहनांना वाहतूक सुरू करण्यात आली आहे

रुबिन मुजावर (कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज ) अखेर  यावर्षी मुंबईहून गावाकडे येणाऱ्या गणेश भक्तांची प्रतीक्षा संपले कारण मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर सर्वात मोठा असलेला कशेडी बोगदा आता खुला झाला आहे या बोगद्यामधून सध्या हलक्या वाहनांना जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे त्यामुळे मुंबईपासून कोकणात प्रवास सुखकर होणार आहे या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अपूर्णावस्थेतील कामे युद्धपातळीवर सुरू होती

 वाहतूक नियंत्रणासाठी बोगद्याच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटातच सुस्साट होणार असला तरी मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना काही नियम पाळूनच प्रवास करावा लागणार आहे

या बोगद्यातील प्रवास आरामदायी होणार असला तरी कशेडी बोगद्यातून मार्गस्थ होत असताना वाहतुकीचे नियम पाळूनच प्रवास करावा लागणार आहे. बोगद्याची लांबी १.७१ किमी असून यादरम्यान वाहन न थांबवता ताशी ३० किमीच्या वेगाने मुख्य रस्त्यावर वाहन आणावे लागणार आहे. ठेकाधारक कंपनीने बोगद्यात सुरक्षेच्या कामांसह वीजपुरवठ्याची देखील परिपूर्ण व्यवस्था केली आहे.