जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर यांचा 51 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात लांजा येथे संपन्न
रुबीन मुजावर || कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज||
लांजा चे सुपुत्र न्यू इंग्लिश स्कुल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कला व वाणिज्य महाविद्यालयातिल प्रसिद्ध क्रीडा शिक्षक रवींद्र वासुरकर यांचा आज ५१ वा वाढदिवस विद्यार्थी व लांजा नागरिकांमधून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला
आपल्या शैक्षणिक सेवेत रविंद्र वासुरकर यांनी अनेक मुलांना घडवले आणि हजारो पारितोषिके मिळवली. राज्य पातळीवर असो किंवा देश पातळीवर त्यांनी लांजा चे नाव मोठ्या प्रमाणात लौकिक केले आहे तसेच नेहमीच गरुजूच्या मदतीस धावणारे शिक्षक अशी ओळख त्यानी निर्माण केली आहे. त्यांचा हा 51 वा जन्मदिवस आठवणीत राहील असा साजरा करण्यात आला यावेळी लांजा शहरातून बाईक रॅली द्वारे त्यांना लांजा हायस्कूल येथे आणण्यात आले
त्यांचे खास कौतुक म्हणजे कोविड च्या महामारीत काम करणाऱ्या यंत्रणेला 140 दिवस मोफत चहा नाष्टा व जेवण दिला. त्यांच्या या कामाची दखल घेत सर्व शासकीय अधिकारी देखील त्यांच्या या वाढदिवस कार्यक्रमाला हजर होते
आज वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी टाळ्याच्या गजरात आपल्या लाडक्या शिक्षकाचे स्वागत केले व कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात असून मान्यवरांनी रवींद्र वासुरकर यांना शुभेच्छा दिल्या .यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयवंत शेट्ये,भाऊ वंजारे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे ,सुनील कुरूप,तहसीलदार प्रमोद कदम,गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, विजय बंडगर सर्व शिक्षक वर्ग व मित्र मंडळ या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
Bni salah transfer