कुंभार्ली घाटात भीषण अपघात दोनशे फूट खोल दरीत कार गेली.. एकाचा मृत्यू

कुंभार्ली घाटात भीषण अपघात दोनशे फूट खोल दरीत कार गेली.. एकाचा मृत्यू
सौजन्य ट्वेंटी फोर न्यूज

रत्नागिरी जिल्ह्यातील  कुंभार्ली घाटात कारचा भीषण अपघात झाला आहे कार वरील ताबा गगेल्याने कार सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळली. यात चिपळूणातील सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे जागीच मृत्यु झाले तर त्यांच्याबरोबर असलेली महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. 

सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चिपळूण विभागात शाखा अभियंता म्हणून दिर्घकाळ कार्यरत होते. काही वर्षापूर्वी त्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली होती. तेथून कराड येथे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. मे अखेर ते सेवानिवृत्त झाले. 

अपघाताची माहिती मिळताच अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी व पोफळीतील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिला व भिसे यांचा मृतदेह बाहेर काढला. जखमी महिलेला कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर भिसे यांचे शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. भिसे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी पत्नी असा परिवार आहे.