२० जानेवारी रोजी मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन
आमदार डॉ.राजन साळवीच्या मागणीनुसार मच्छीमार बांधवाच्या समस्या व मागण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री ना.अस्लम शेख यांच्या दालनामध्ये दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०२.००वा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने केलेल्या पर्ससीन मासेमारीच्या नव्या कायद्यामध्ये काही अंशी बदल होणेसाठी राजापूरातील साखरी नाटे येथील पर्ससीनधारक मच्छीमारांनी नाटेतील मत्सव्यवसाय परवाना अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सोमवारपासून सुरूवात केली असून सदर साखळी उपोषणाला आमदार डॉ.राजन साळवी यांनी भेट दिली होती. तसेच रत्नागिरी येथील मिरकरवाडा येथील मच्छीमारांना हि भेट दिली होती. त्यानुषंगाने आमदार डॉ.राजन साळवी यांनी अधिवेशन दरम्यान हि सदर बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली होती तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री ना.अस्लम शेख यांचेकडे पत्रव्यवहार करून मच्छिमारांच्या समस्या व मागण्या सोडविण्याच्या दृष्टीने उच्च तंत्रशिक्षणमंत्री ना.उदय सामंत तसेच मच्छिमारांच्या शिष्टमंडळासमवेत आपले दालनामध्ये एक संयुक्त बैठकीचे आयोजन व्हावी अशी विनंती आमदार डॉ.राजन साळवी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री ना.अस्लम शेख यांचेकडे केली व सदर बैठक लवकरत लवकर घेणेसाठी मत्स्यव्यवसाय मंत्री महोदयांकडे दूरध्वनी द्वारे संपर्क केला होता. त्यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री ना.अस्लम शेख यांनी तात्काळ सदर बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार मत्स्यव्यवसाय मंत्री ना.अस्लम शेख यांनी या बैठकीचे आयोजन केले असुन यामध्ये महाराष्ट्र शासनाने केलेल्या पर्ससीन मासेमारीच्या नव्या कायद्यामध्ये काही अंशी बदल होणेच्या निर्णयाबाबत साकारात्मात चर्चा होईल असे उच्च तंत्रशिक्षणमंत्री ना.उदय सामंतव आमदार डॉ.राजन साळवी यांनी स्पष्ट केले आहे.
Bni salah transfer