'हर घर तिरंगा' या अनुषंगाने लांजा पाच नंबर शाळेत विविध कार्यक्रम

'हर घर तिरंगा' या अनुषंगाने लांजा पाच नंबर शाळेत विविध कार्यक्रम

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

आझादी का अमृत महोत्सव सद्या भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आझादी का अमृत अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा विविध स्तरावर आयोजित करण्यात येत आहेत. जि. प. शाळा लांजा नं. 5 मध्ये सर्व उपक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. विविध स्पर्धा मधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आज संपूर्ण लांजा शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी भारतमातेची आकर्षक अशी वेशभूषा करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी पांढऱ्या टोपी ला केशरी व हिरवी लेस लावून डोक्यावर परिधान केली होती. ढोल ताशांच्या गजरात व घोषणा देत मुलांची प्रभात फेरी संपूर्ण लांजा शहरातून जात असताना सर्वजण कौतुकाचा वर्षाव करत होते. 

शाळा लांजा नं 5 ची प्रभात फेरी शहरातून निघत असताना ST स्टॅंड परिसरात लांजा नं. 5 व लांजा नं. 1 शाळेच्या प्रभात फेरीचा संगम पहावयास मिळाला.

याप्रसंगी लांजा तालुक्याचे तहसीलदार कदम, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी बंडगर, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद देसाई व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विमल चव्हाण व सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.