आमदार राजन साळवी यांच्या गाडीला अपघात

आमदार राजन साळवी यांच्या गाडीला अपघात

लांजा राजापूर साखरपा चे आमदार राजन साळवी याच्या गाडीला  रत्नागिरी येथील भाट्ये येथे झरी विनायक मंदिरा   समोर आज सकाळी 11.30 वाजता अपघात झाला आहे. हा अपघात एका मोटरसायकल स्वाराला धडक दिल्याने झाला यात मोटरसायकल स्वार व एक मुलगी जखमी झाली असून त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान आमदार राजन साळवी यांनी स्वतः त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून ते जातिनिशी पाहत आहेत.आमदार राजन साळवी हे भाट्ये मार्गे राजापूर ला जात असताना हा अपघात झाला आहे. आमदार राजन साळवी व त्यांचे सर्व सहकारी सुखरूप आहेत या अपघातामध्ये आमदार राजन साळवी यांच्या गाडीचे व मोटरसायकल स्वराचे थोडे नुकसान झाले आहे