बिबट्या घरात शिरून महिलेवर हल्ला ; महिला गंभीर जखमी
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
बिबट्याने घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यामध्ये घडली आहे यात महिला गंभीर जखमी झाली असून ग्रामस्थांनी महिलेला घराबाहेर काढल्याने तिला जीवदान मिळाले आहे आणि बिबट्या घरातच अडकल्यानंतर त्याठिकाणी जीवित हानी टळली आहे या घटनेमुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आह
श्रीमती कलावती काशीराम कुळ्ये वय वर्षे 75 ह्या जखमी झालेल्या असून त्यांना संगमेश्वर येथील शासकीय रुग्णालय उपचारासाठी श्री सुरेश गंगाराम खांडेकर , शांताराम करंडे, प्रतीभा भोल्ये यांनी दाखल केले. व उपचार घेतले .
बिबट्या पकडण्यासाठी माननीय विभागीय वन अधिकारी श्री दिपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक श्री सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कुळ्ये येथील स्थानिक लोकांच्या मदतीने व वनपाल श्री तौफिक मुल्ला, वनरक्षक श्री एन एस गावडे , सुरज तेली , आकाश कडू कर, संजय रणधीर तसेच सरपंच पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने बिबट्यास सुस्थितीत पकडला आहे. बिबट्याचे वय अंदाजे सात वर्षे असुन नर आहे , पशुवैद्यकीय अधिकारी देवरुख यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे , तो सुस्थितीत असलेने त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सदर घटनेचा पंचनामा केला असून औषधे उपचारासाठी देय असलेली रक्कम शासनाच्या वतीने देण्यात येईल असे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी सांगितले आहे .
तसेच आशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी गावात आढळून आल्यास किंवा अनैसर्गिक रित्या आढळून आलेस वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 या नंबरवर माहिती देण्याचे आवाहन वन विभागाचे वतीने करण्यात येत आहे
Bni salah transfer