कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून 18 रेल्वे विद्युत इंजिनावर धावणार
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
कोकणात रेल्वे चा प्रवास जलद गतीने होणार असे काही वर्षांपूर्वी सांगितले गेले होते मात्र आता ते सत्यात उतरले आहे उद्यापासून कोकण रेल्वेमार्गावरील सर्वांत महत्त्वाची मांडवी एक्स्प्रेस तसेच कोकणकन्या एक्सप्रेस उद्यापासून (दि. २० सप्टेंबर) पासून विद्युत इंजिनवर धावणार आहेत. यापाठोपाठ येत्या काही दिवसांत कोकण रेल्वेच्या मार्गावरून एकूण १८ गाड्या विजेवर चालविल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे गेल्या वर्षी या मार्गावरून मालगाड्यांची वाहतूक सुरू झाली. आता रत्नागिरीतील ट्रॅक्शन सब स्टेशनचे उर्वरित काम पूर्ण झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच प्रवासी गाड्या विद्युत इंजिनवर चालवण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
उद्यापासून मुंबई सीएसटी ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या तसेच मांडवी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या विद्युत इंजिनवर धावणार आहेत. कोकण रेल्वेमार्गे रेल्वेच्या अन्य झोनमधील धावणाऱ्या गाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात आहे.
Bni salah transfer