सावधान महाराष्ट्रात येते आहे धुळीचे वादळ
कोकणात पाऊस तर मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरू झाले आहेत यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दुष्मांमानता कमी झाली आहे गेल्या काही दिवसापासून निसर्गाने थंडी पावसाची बरसात सुरू केली आहे गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे
तर पाकिस्तानातून सुटलेले वादळ महाराष्ट्रावर धडकले हे धुळीचे वादळ गुजरात अरबी समुद्र मार्गे महाराष्ट्र पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई-पुण्यासह मध्य महाराष्ट्रात थंड वारे सुरू झाले आहेत त्यामुळे कोकण आणि महाराष्ट्रात दृश्यमानता कमी झाली आहे पुण्यात व मुम्बई मधे धूलिकणांचे प्रमाण वाढल्यामुळे नोंद सफर ने केली आहे यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देखील देण्यात आला आहे हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुळीचे कण हवेत पसरत आहेत त्यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे शिवाय अधून मधून ढगही ये-जा करत असल्यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाही यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे मात्र येत्या एक-दोन दिवसात कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत
Bni salah transfer