शासनाची कोणतीही मदत न घेता लांज्यातिल एका संस्थेने अपंगणा केली मदत

शासनाची कोणतीही मदत न घेता लांज्यातिल एका संस्थेने अपंगणा केली मदत
अपंगाना वाटप करण्यात आलेले साहित्य व सर्व मान्यवर दिसत आहेत

लांजा(प्रतिनिधि)

लांजा तालुक्यातील दिव्यांग (अपंग) बांधवांची अचुक गरज ओळखून त्यांना शासनाकडून  कोणतीही मदत न घेता स्वखर्चातून दीपक कांबळे यांनी  माणुसकीची भिंत या संस्थेच्या माध्यमातून  मोफत व्हिलचेअरचे वाटप करून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे . तसेच त्यांचे हे सामाजिक कार्य भिंतीच्याही पलीकडील असल्याचे गौरवोद्गार  लांजा सभापती सौ.मानसी आंबेकर यांनी लांजा येथील कार्यक्रमात व्यक्त केले .

माणूकीची भिंत प्रतिष्ठान ( रजि . ) मुंबई यांच्या वतीने व लांजा तालुका अपंग संघटना तसेच लांजा तालुका माध्य. व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ  यांच्या विशेष प्रयत्नातून कुलकर्णी - काळे छात्रालय लांजा येथे तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थी यांना  मोफत व्हिलचेअर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लांजा सभापती मानसी आंबेकर बोलत होत्या यावेळी त्या पुढे म्हणाल्या की , आपण समाजाचे काय तरी देणे लागतो या भावनेतून तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र दीपक कांबळे आणि त्यांचा परिवार हा माणुसकीची भिंत या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील आश्रम शाळा , महिलाश्रम , दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थी  यांची गरज काय आहे हे ओळखून त्यांना निरपेक्ष भावनेतून मदत करण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहे . त्यांच्या या सामाजिक कार्याला तोड नाही . आमच्या तालुक्यातील व्यक्ती अशा पध्दतीने काम करत आहे . याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेला समाज कार्याचा वसा असाच पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करताना त्यांना पंचायत समितीच्या वतीने नेहमीच सहकार्य राहील असे देखील आश्वासन सौ. मानसी  आंबेकर यांनी दिले . 
    या कार्यक्रमाला प्रमुख  अतिथी म्हणून माजी सभापती लिला घडशी , लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे , पंचायत समिती सदस्य श्रीकांत कांबळे , अशोक काजोळकर , प्रविण काजोळकर , माता रमाबाई पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक बी. . आर . कांबळे , माणूकीची भिंत संस्थेचे अध्यक्ष दिपक कांबळे ,  सौ .दिपाली कांबळे , लांजा तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष  संदेश कांबळे , पुनस गावचे सरपंच इलियाज बंदरी, काशिनाथ कांबळे ,  अपंग संघटनेचे  तालुका अध्यक्ष गौतम सावंत , आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिपक कांबळे  , गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे , बी . आर . कांबळे ,  संदेश कांबळे , गौतम सावंत यांनी आपली मनोगते व्यक्त केली व या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले  . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणूकीची भिंत या संस्थेचे संतोष मोरे , समित जाधव , अतुल कांबळे , विजय पुरळकर , साईली जाधव , जुईली जमादार , शरयु पुरस्कार , तसेच अपंग संघटनेचे सचिव सुरेश दरडे , खजिनदार राजेंद्र फणसमकर , सहसचिव गणपत कुर्तडकर आदी  पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी तालुक्यातील १५ दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले . यावेळी अपंग बांधवांच्या वतीने देखील या संस्थेला धन्यवाद देण्यात आले.