आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याची धमकी
दरम्यान याबाबत रत्नागिरि शहर पोलिस ठाण्यात दिनांक 12 जानेवारी रोजी आमदार राजन साळवी यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एनसी दाखल दाखल करून घेतली आहे.
आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्प बाबत विरोधी भूमिका घेतल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबांना मारण्याची धमकी या फोन द्वारे देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की आमदार राजन साळवी हे लांजा राजपुर मतदारसंघात सेनेचे आमदार म्हणून 2009 सालापासून कार्यरत आहेत. नानार रिफायनरी प्रकल्प ला स्थानिक जनतेच्या सोबत राहून विरोध दर्शविल्याने त्यांना मोबाईल फोनवरून आमदार राजन साळवी यांच्या मोबाईल वर 99 70 16 90 25 यावर दिनांक 10/ 1/ 2022 रोजी पहिला संध्याकाळी साडे सात वाजता फोन आला. त्यात अज्ञात इसमाने मोबाईल वरून त्यांना सांगितले की रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख एवढे बोलून त्याने फोन बंद केला आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून14 मिनिटाच्या सुमारास परत फोन करून रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे अशी धमकी आल्याने आमदार राजन साळवी यांनी 12/01/22 शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे .
हा फोन कुठून आला आणि कोणी केला आणि कोणी धमकी दिली याबाबत पोलिस आता संपुर्णरित्या तपास करत आहेत
Bni salah transfer