लांजा नागरी सहकारी पतसंस्थेला सन 2021 चा सलग दुसरा बँन्को ब्लू रिबन पुरस्कार जाहीर
लांजा नागरी सहकारी पतसंस्थेला सन 2021 चा सलग दुसरा बँन्को ब्लू रिबन पुरस्कार जाहीर
महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात बळकटी आणणरया पतसंस्थाना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून अविज पब्लीकेशन कोल्हापूर व गँलेस्की इनमा पुणे यांचे तर्फे देण्यात येणारा सन 2021 चा सलग दुसरा राज्यस्तरीय बँन्को ब्लू रिबन पुरस्कार जाहीर झाला आहे सदरचा पुरस्कार लोणावळा येथे दिनांक 14 मार्च 2022 रोजी मान्यवरांचे हस्ते प्रदान करणेत येणार आहे संस्थेला मिळालेला बँको ब्लू रिबन पुरस्कार 15 कोटी ते 20 कोटी ठेवीच्या गटातून उत्तम गुणपत्रकानुसार प्राप्त झाला आहे. सदरचा पुरस्कार मिळण्यासाठी सभासद ठेवीदार कर्जदार व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा लाभला असल्याचं मत व्यवस्थापक चंद्रशेखर रुमडे यांनी व्यक्त केले.सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व कर्मचारी पिग्मी व आर डी एजंट यांचे अभिनंदन केले जात आहे.
बँकेचे सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेला विश्वासच बँकेला यशाच्या शिखरावर घेऊन जात आहे याचा मला अभिमान असल्याचे मत बँकेचे चेअरमन सचिन भिंगार्ड यांनी केले.
Bni salah transfer