लांजा ते देवधे दरम्यान नवीन सिमेंट काँक्रेट रोडवर दोन ठिकाणी दरड कोसळली

लांजा ते देवधे दरम्यान नवीन सिमेंट काँक्रेट रोडवर दोन ठिकाणी दरड कोसळली
रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेली दरड दिसत आहे

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

मुंबई गोवा महामार्गावर लांजा ते देवधे दरम्यान नवीन रस्त्यावर दरड कोसळल्याने या रस्त्यावरून चालणारी वाहतूक बंद करावी अशी मागणी लोकांमधून होत आहे सदर हा रस्ता मुंबई गोवा महामार्गाचा नवीन बनवलेला सिमेंट काँक्रेट रस्ता आहे मात्र या रस्त्यावरून रहदारी सुरू असून अचानक आणखी या ठिकाणी दरड कोसळन्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या रस्त्यावर चालणे धोकादायक झाले आहे

मात्र बाजूला जुना असलेला रस्ता खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्यामुळे या नवीन रस्त्याचा उपयोग लोकांकडून होत आहे मात्र नवीन रस्त्यावरच भले मोठे दगड दरड खाली येत असल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे  तरी संबंधित ठेकेदारांनी याकडे लक्ष देऊन हे पडत असलेली दरडी यांचा धोका लक्षात घेऊन हा मार्ग बंद करावा  व जुना रस्ता खड्डे भरून चांगला करावा अशी मागणी होत आहे