लांजातील जिल्हा परिषद शाळा नंबर 5 (मॉडेल स्कूल ) म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आकर्षण ठरणार
*लांजा* तालुक्यातील *CCTV व सोलर प्रकल्प- बोअरवेल- विज्ञान केंद्र- लोकवर्गणीतुन नवीन 2 वर्गखोल्या- संगणक कक्ष- इ- लर्निंग प्रकल्प- प्रोजेक्टर रूम- वॉटर फिल्टर प्लांट- वाचनालय- अद्ययावत वाद्य वृंद कक्ष- खेळणी घर- शासन मंजूर 2 वर्गखोल्या* आदी शैक्षणिक व भौतिक प्रकल्पाने अद्यावत असलेल्या *मॉडेल स्कुल-जिल्हा परिषद शाळा लांजा नं. ५* चे उद्घाटन समारंभ *राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी* ह्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी शहरप्रमुख तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद देसाई, मा.शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मंचेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महंमदभाई रखंगी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, काँग्रेसचे नेते भगवान ढेकणे, जनता नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन भाई भिंगार्डे, मा.जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरूपाताई साळवी, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, मा.सभापती लीलाताई घडशी मुख्याध्यापिका विमल चव्हाण व मान्यवर उपस्थित होते.
Bni salah transfer