लांजा तालुक्यातील पूर्व भागात वादळी वाऱ्याचा हाहाकार

लांजा तालुक्यातील पूर्व भागात वादळी वाऱ्याचा हाहाकार

गेल्या काही दिवसापासून पावसाने पूर्णपणे  पाऊस गेला अशी शक्यता वाटत असतानाच बुधवारी  सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस  बरसला. संपूर्ण लांजा तालुक्यात हा पाऊस कोसळला असला तरी भांबेड  बाजारपेठ या ठिकाणी पावसासह आलेल्या वादळाने येथील दोन घरांचे नुकसान झाले आहे घरांवर असलेले सिमेंट पत्रे तसेच छपरासह कौले उडून गेल्याने या दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शैलजा जयराम गांधी यांच्या घराचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे विलास परब यांचे घराचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते तसेच या घटनेचा पंचनामा भांबेड मंडळ अधिकारी  मराठे तसेच कोतवाल विजय दळवी यांनी केला आहे