आमदार राजन साळवी यांना रत्नागिरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते राजन साळवी यांना काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथील त्यांच्या कार्यालयात भेटून शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत काँग्रेसचे नेते रमेश शहा, इम्तियाज मुजावर आतिफ साखरकर आदींनी आमदार राजन साळवी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व भविष्यातील कारकिर्दी करिता शुभेच्छा दिल्या
Bni salah transfer