लांजा तालुक्यात तीन हजार फूट उंचीवर जाऊन तहसीलदारांनी "हर घर तिरंगा" अभियान पार पाडले

लांजा तालुक्यात तीन हजार फूट उंचीवर जाऊन तहसीलदारांनी "हर घर तिरंगा" अभियान पार पाडले
3000 फूट उंचीवर तिरंगा फडकवताना लांजा तहसीलदार प्रमोद कदम दिसत आहेत

रुबीन मुजावर   Kokan Live Digital News:

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत आहेत त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहुन देशभक्तीची भावना कायमस्वरूपी मनात रहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने “आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत 13 ऑगस्ट 2022  ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरात "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  या अभियानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी लांजा तालुक्यात ही विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत अशातच लांजा तहसीलदारांनी थेट जिल्ह्यातील उंच ठिकाण असलेले लांजा तालुक्यातील माचाळ या गावी जाऊन  या कार्यक्रमासंदर्भात तेथील नागरिकांमध्ये जनजागृती केली व तीन हजार फूट उंचीवर तिरंगा फडकवला त्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक केले जात आहे 

 रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी.एन. पाटील, जिल्हाधिकारी यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी "हर घर तिरंगा" अभियान राबवण्यात येत आहे अशाच पद्धतीचे अभियान लांजा तालुक्यात देखील गावा गावांमध्ये सुरू आहे

 या कार्यक्रमा वेळी दुर्गम भागातील काही वाड्यांमध्ये लांजा पुरवठा विभागातर्फे राशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम देखील पार पडला यावेळी लांजा तहसीलदार प्रमोद कदम, लांजा पंचायत समिती बीडियो संतोष मेहत्रे, विजय बनगर पुरवठा अधिकारी,राहुल शितोळे ,कुलदीप गायकवाड ,तलाठी संतोष हांडे तसेच लांजा न्यू इंग्लिश हायस्कूलचे वासुरकर सर उपस्थित होते