मांडवी पर्यटन संस्थेच्या बुस्टर डोस कॅम्पला भरघोस प्रतिसाद
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना पासुन देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी १८ वर्षावरील सर्वांना मोफत बुस्टर डोसची घोषणा केली . १५ जुलै पासुन पुढील ७५ दिवस हे बुस्टर डोस महाराष्ट्रात मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली . त्या अनुषंगाने आज रवीवार दिनांक १७ जुलै रोजी मांडवी पर्यटन संस्था आणि जिल्हा आरोग्य कार्यालय यांच्या वतीने गगनगिरी महाराज मठ सभागृह , थिबा पॅलेस येथे बुस्टर डोस कॅम्प आयोजीत करण्यात आला .
ॲड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते गगनगिरी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आला . त्यांच्या सोबत सचीन वहाळकर . मनोज पाटणकर ,ॲड महेंद्र मांडवकर , सचीन करमरकर , विक्रांत जैन , सौ ऐश्वर्या जठार , सौ प्राजक्ता रुमडे उपस्थित होते .
आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे ॲड दीपक पटवर्धन यांनी प्रधामनंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिलेल्या विविध योजनांची माहीती दिली तसेच हे शिबीर आयोजीत केल्याबद्दल मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांचे अभिनंदन केले .
कीर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी तसेच गगनगिरी महाराज मठाचे ट्रस्टी यांचे आभार मानले
या कॅम्प मध्ये कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन
लसीच्या ३११ लाभार्थीनी लाभ घेतला . सकाळी ११ वाजता सुरु होवुन ४:३० वाजता संपला . यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री अनिरुद्ध आठल्ये यांनी सदिच्छा भेट दिली . कॅंप मध्ये आलेल्या सर्वांना या लसिकरण मोहीमेचा लाभ घेता आला . सचिन वहाळकर , मोहन पटवर्धन , भाई जठार , आशिष पिलणकर यांनी योग्य नियोजन केले होते त्यांना रामकृष्ण पानगले ,प्रविण जोशी , विजय वालम , प्रकाश चौगुले , विलास मुळे , राजन फाळके , प्रविण रुमडे , अमोघ पिलणकर , वरद पाटोळे , सिद्धेश सुर्वे , परीस पाटील , सौरभ पिलणकर, दिलीप भाटकर यांचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजन पटवर्धन यांनी केले .
Bni salah transfer