रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 60 टक्के शाळा बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात
रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाडी-वस्तीवर होऊ लागला असून पाळीव प्राण्यांचा बळी जात आहे. अनेक ठिकाणी मानवी वस्तींमध्येही भितीचे वातावरण असतेच. बिबट्याने पाळीव पशुंचा बळी घेतल्याच्या घटना घडून गेलेल्या परिसरात जिल्हापरिषदेच्या 2600 पैकी 60 टक्के शाळा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दुर्गम शाळांची यादी बनविण्यासाठी वन विभागाने दिलेल्या अहवालातून पुढे आल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षक बदल्यांसाठी शासनाच्या सात निकषानुसार दुर्गम भागातील शाळांची यादी बनविली आहे. त्यात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमीचा निकष आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 43 प्राथमिक शाळांचा समावेश झाला. रत्नागिरी, संगमेश्वरसह दापोलीतील सर्वाधिक शाळा आहेत. गावाच्या एका टोकाला प्राथमिक शाळा असल्याने विद्यार्थ्यांना जंगल भागातून किंवा मानवी वस्ती नसलेल्या मोकळ्या रस्त्यावरुन मार्गक्रमण करावे लागते. तो परिसर बिबट्याच्या अधिवासातील असतो. अनेक गावात पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडत आहेत. त्या भागातील शाळांचा समावेश दुर्गममध्ये करा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी यांनी दिले होते. त्यानुसार वन विभागाकडून अहवाल मागविण्यात आला. त्यात 2600 पैकी 60 टक्केहून अधिक म्हणजेच सुमारे 1400 शाळांचा समावेश होऊ शकतो. शहराजवळील काही शाळाही त्यात घ्याव्या लागणार आहेत. दुर्गमची यादी वाढेल हे पाहून पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याच्या परिसरात शाळा विचारात न घेण्याचा निर्णयही झाला आहे. नव्याने केलेल्या यादीत सुमारे 650 शाळा असून अंतिम यादी मुख्य कार्यकारी अधिकार्यांबरोबरच्या बैठकीनंतर जाहीर होईल. याला शिक्षण विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.
Bni salah transfer