लांजा वेरवली मधील एका शाळेमधील मित्र-मैत्रिणी 37 वर्षानंतर गेट-टुगेदर च्या माध्यमातून एकत्र आले

लांजा वेरवली मधील एका शाळेमधील मित्र-मैत्रिणी 37 वर्षानंतर गेट-टुगेदर च्या माध्यमातून एकत्र आले
गेट-टुगेदर ला जमलेले सर्व मित्र मैत्रिणी दिसत आहेत

KOKAN LIVE DIGITAL NEWS

एक अनोखे गेट-टुगेदर ज्यामध्ये तब्बल 37 वर्षानंतर एकाच वर्गात शिकणारे सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आले

1984-85च्या 10 वी बॅचचे गेट टूगेदर दि.29 मे 2022 रोजी श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे संपन्न झाले.

सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना सुवर्णा शिवगण(सौ. जान्हवी भागवत) हिने केली नंतर दिवंगत वर्गमित्र सूर्यकांत पाथरे, अंकुश नार्डेकर,चंद्रकांत बेर्डे,संतोष शेरे,सुनील शेरे ,शशांक सरदेसाई तसेच दिवंगत गुरुजन आणि ज्ञात अज्ञात व्यक्तींना दोन मिनिटं मौन पळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


सर्व मित्रमैत्रिणी 37 वर्षांनी एकत्र जमलं होते त्यामुळे प्रत्येकाने आपला परिचय करून दिला.
नाश्त्यानंतर सभागृहात संस्थेच्यावतीने या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा करण्यात आला, या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते, यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले तसंच दि.31 मे रोजी सेवानिवृत्त होणारे  संस्थेचे मुख्याध्यापक श्री. अशोक कांबळे व चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री. कृष्णा जाधव यांचा 1985 च्या बॅचतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, काही विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.


यानंतर 37 वर्षांनी एकत्र जमलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही पार पडला, जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी सुवर्णा शिवगण, प्रकाश जाधव, विलास बेर्डे,राजेंद्रकुमार पाथरे, इम्तियाज मुजावर,उदय कोळवणकर, महेंद्र डोळस यांनी विशेष परिश्रम घेतले होते. यांच्यासोबत नितीन डोळस, अनंत पवार, श्रीधर गंगाण, विद्या डोळस, कल्पना रेडीज, संध्या कोलते, ज्योती कोळवणकर, जयश्री डोळस, शशिकला डंबे इत्यादी विद्यार्थी सहभागी झाले होते.
अत्यन्त उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा स्नेहमेळावा पार पडला

अशा या गेट-टुगेदर ची चर्चा लांजा पासून रत्नागिरी पर्यंत ऐकायला मिळत आहे