लांज्यात महामार्गा बाबत होणाऱ्या आंदोलनाला स्थगिती येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत लांजा शहरातला रस्ता होणार चकाचक

लांज्यात महामार्गा बाबत होणाऱ्या आंदोलनाला स्थगिती येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत लांजा शहरातला रस्ता होणार चकाचक
लांजा चव्हाटा मंदिरामध्ये जमलेले सर्व ग्रामस्थ दिसत आहेत

Kokan Live Digital News:

अखेर उद्या होणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या आंदोलनाला सध्यास्थितीत स्थगिती मिळाली आहे आज लांजातील चव्हाटा मंदिरामध्ये ग्रामस्थांची बैठक पार पडली या बैठकीला मुंबई-गोवा महामार्गाचे एक्झिक्यूटिव्ह बांगर साहेब व किरण शेठ सामंत, लांजा डिवाइस पी ,लांजा पोलीस अधीक्षक ,लांजा तहसीलदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी पार पडलेल्या या बैठकीत बैठक सुरु होण्या अगोदर लोकांमध्ये मुंबई-गोवा महामार्ग वरच्या परिस्थितीवर आक्रोश पहायला मिळाला त्यानंतर सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी देखील या बैठकीत उपस्थित होते

बैठकीला सुरुवात झाली आणि लांजा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेटे यांनी सर्वांसमोर आंदोलनाची दिशा कशी असेल व आंदोलन कसे करायचे याबद्दल माहिती दिली त्याचप्रमाणे आंदोलन करण्याची ही स्थिती का आली आहे हेदेखील पटवून सांगितलं त्यानंतर व्यापारी संघटनेचे सल्लागार मोहम्मद रखांगी यांनीदेखील ग्रामस्थांच्या व्यथा याठिकाणी मांडल्या


मुंबई-गोवा महामार्गाची चर्चा अशीच सुरू असताना थोडावेळ ग्रामस्थाने गोंधळ देखील केला होता त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाचे मुख्य अभियंता बांगर यांनी हायवे बाबत पूर्णतः माहिती दिली हायवेचे काम कुठच्या कंपनीकडे सद्यस्थितीत आहे आणि कशा पद्धतीने हायवे होणार आहे हे देखील यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा आणि रायगड जिल्हा यांचे काम पूर्णत्वास गेले आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील काम काही कालांतराने होण्याचे चिन्ह आहेत असे बोलले


 त्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी याबाबत जाब विचारला त्यांनी मागणी केली की मुंबई-गोवा महामार्ग किती वर्षात पूर्ण होऊ दे मात्र लांजा शहर व आसपास जी रस्त्याची स्थिती आहे ते काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी केली त्यांच्या मागणीला मान देत किरण सामंत यांनी संपूर्ण जमलेल्या ग्रामस्थांना शब्द दिला की येत्या 10 फेब्रुवारी पर्यंत लांजातील जो खराब झालेला रस्ता आहे तो पूर्णता चांगल्या पद्धतीने चांगल्या कॉलिटी चा करून देऊ असा शब्द दिला

त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले मात्र  उद्या दिनांक 27 जानेवारी ला लांजा शहर बंद ठेवण्यात येणार आहे व शेट्ये कॉम्प्लेक्स येथे सर्व ग्रामस्थ जमून त्यांनी शांततेत तहसील कार्यालय येथे जाऊन लिखित स्वरूपात या बाबत प्रत घ्यायची आहे व त्यानंतरच हे आंदोलन पूर्णता स्थगित करण्यात येईल असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेटे यांनी सर्व ग्रामस्थांना सांगितले आहे त्यामुळे सध्यातरी हे मुंबई-गोवा महामार्ग रस्ता रोको आंदोलन काही काळासाठी तरी स्थगित झाले आहे