लांजातील एक वेगळं व्यक्तिमत्व ज्यांच्या बरोबर रस्त्यात स्वतः नगराध्यक्षांनी काढल्या सेल्फी

लांजातील एक वेगळं व्यक्तिमत्व ज्यांच्या बरोबर रस्त्यात स्वतः नगराध्यक्षांनी काढल्या सेल्फी
नंदू मांगलें सोबत नगराध्यक्ष मनोहर बाईत राजू धावणे व प्रवीण झेधे दिसताहेत

नंदू मांगले लांजातील एक असं व्यक्तिमत्व जे कोणताही सण असो किंवा कोणतीही जनजागृती असो ती करण्याची त्यांची ही एक अनोखी पद्धत लांजा वासीय कित्येक वर्षापासून बघत आहेत 

कारोनाच्या या दोन वर्षाच्या कालखंडात त्यांनी आपल्या दुचाकीवरून स्पीकर लावून लोकांची जनजागृती केली तसेच गेल्या कित्येक वर्षापासून ते प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्य दिन असो किंवा कोणताही सण असो त्यादिवशी ते आपल्या दुचाकीवर बसून स्पीकर च्या माध्यमातून संपूर्ण लांज्यात आपली दुचाकी फिरवून जनजागृती करत असतात 

आजही 26 जानेवारीच्या दिनानिमित्त ते सकाळी सहा वाजल्यापासून देशभक्तीची विविध गाणी लावून संपूर्ण लांजा शहरात फिरताना दिसले त्यांचा अनोखा उपक्रम पाहून लांजा चे नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्याना भर रस्त्यात थांबून त्यांच्या बरोबर सेल्फी देखील काढल्या 
त्यामुळे असा हा अवलिया संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे दरम्यान हा अवलिया एक व्यवसायिक असून सण असो किंवा राष्ट्रीय कार्यक्रम असो त्यासाठी आपला वेळात वेळ काढून ही जनजागृती करतो त्यामुळे त्याच्या सर्व स्तरातून कौतुक केले जाते