रत्नागिरीत राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा... फुटबॉल ला किक मारून कोणी केले स्पर्धेचे उद्घाटन वाचा सविस्तर
रत्नागिरी येथील कै, प्रमोद महाजन क्रिडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स स्पर्धेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना,उदय सामंत,डीवाएसपी सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी किक मारून उत्साही वातावरणात उद्घाटन केले,या प्रसंगी जिल्हा प्रमुख विलास चाळके तालुका प्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हा प्रमुख बाबु म्हाप, वरिष्ठ पत्रकार अलिमियां काझी,किशोर मोरे,युवा नेते नौशीन काझी, मुन्ना देसाई,सुहेल मुकादम, मुख्य संयोजक साहील पठाण,सुरज शेट्ये,आदी मान्यवर उपस्थित होते,
रत्नागिरी येथे फुटबॉल करीता वेगळे मैदान असावे म्हणून आपण नक्की प्रयत्न करु असे ना,उदय सामंत म्हणाले आणि स्पर्धेला शुभेच्छा दिल्या तीन दिवस चालणाऱ्या डे नाईट राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत एकूण 18 संघाने भाग घेतला असल्याचे संयोजक साहिल पठाण यांनी सांगितले, रविवारी रात्री 9 वाजता अंतिम सामना रंगणार आहे व बक्षीस वितरण समारंभ ही मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे साहील पठाण यांनी सांगितले
Bni salah transfer