सिंधुदुर्गच्या फोंडा मध्ये दोन कंटेनरची समोरासमोर धडक
फोंडाघाट एसटी स्टँड च्या अलीकडे तीव्र उतारावर दोन कंटेनरची समोरासमोर धडक बसून, दोन्ही गाड्यांचे स्टेरिंग लॉक झाल्याने आणि रॉड तुटल्याने वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूला गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.दोन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले असून जेसीपी अथवा क्रेन शिवाय गाड्या काढणे अशक्य असल्याने वाहतूक पूर्ववत होण्यास सुमारे दोन ते अडीच तास लागण्याचा संभव व्यक्त होत होती
बऱ्याच वेळानंतर कॉलनी मार्गे वाहतूक पूर्ववत करण्यात आली. घटनास्थळी पोलिस कॉन्स्टेबल मुल्ला कार्यरत असून गाड्या उतारावरून बाजूला काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. संजय नेरूरकर सुभाष मर्ये स्थानिक ग्रामस्थ त्यांना सहकार्य करीत आहेत. दहाच्या दरम्यान क्रेन येऊन रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे
Bni salah transfer