लांजातील एक महिला नगरसेविका मुंबई-गोवा महामार्ग करणार जाम

लांजातील एक महिला नगरसेविका मुंबई-गोवा महामार्ग करणार जाम

लांजा शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 66 चे काम त्वरित पूर्ण न झाल्यामुळे चक्काजाम आंदोलन करण्याबाबत  निवेदन तहसीलदाराना देण्यात आला आहे

सौ दूर्वा प्रसाद भाईशेट्ये नगरसेविका हिने पुढे येऊन हे चक्काजाम आंदोलन करण्याचं जाहीर केले आहे त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की लांजा शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 66 चे काम गेली तीन वर्षे होऊन देखील अर्धवट राहिल्याने महामार्ग पूर्ण नादुरुस्त झाला आहे त्यावरून दररोज जाणाऱ्या वाहनांमुळे शहरातील  कुकूटपालन बसवेश्वर चौक लांजा बाजारपेठ व शहरी भागातील महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे व मातीचे लोळ पसरल्याने काहीच दिसेना असं होत आहे त्यामुळे माणसांना चालताना देखील मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे

तसेच धुळीचे प्रचंड प्रदूषण होऊन रस्त्यावरील माणसांना रस्त्याच्या दुतर्फा घरातील माणसांना धुळीमुळे त्रास सहन करावा लागत आहे नाकातोंडात धूळ जाऊन नागरिक आजारी पडत आहेत यामुळे दुर्धर आजाराने नाही नागरिक बळी पडत आहेत याबाबत जबाबदार महामार्ग ठेकेदार व प्रशासन त्यांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे होते मात्र या सर्व बाबी लक्षात घेता प्रशासन उदासीन दिसत आहे

दिनांक सहा जानेवारी ला तहसीलदार कार्यालय येते पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने जनतेची मागणी लक्षात घेता नागरिकांच्या सततच्या माझ्याकडील पाठपुराव्यामुळे येणाऱ्या बुधवारी 19 जानेवारी रोजी कुकूटपालन शिवपार्वती हाल बसवेश्वर चौक लांजा बाजार पेठ या ठिकाणी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात लांजातील नागरिक तसेच हायवेलगत चे त्रस्त नागरिक व सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत

याची नोंद घ्यावी असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आला आहे यावेळी प्रसाद भाई शेटे ,सचिन लिंगायत ,पंढरीनाथ , हसन दसुरकर ,राजू हळदणकर ,हेमंत् कुंभार, राजू मोरे ,नौशाद नेवरे कर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते