कोकण लाइवः आजचे हेडलाइंस....
➡️ राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख घसरला ; मृत्यू प्रमाण घटले
➡️ एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
➡️ डार्कनेटचा वापर; ड्रग्जसाठी बिटकॉइन!; क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान व अन्य आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी. एनसीबीने एका ड्रग्ज तस्कराला अटक केली असून त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
➡️ कोल्हापूरमध्ये लाचखोरीची आणखी एक घटना उघड; वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अटकेत.फॅब्रिकेशनच्या व्यवसायासाठी नवीन वीज कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच प्रकरण.
➡️ राज्यात आज २ हजार ०२६ नव्या रुग्णांचे निधन झाले असून ५ हजार ३८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार ६३७ वर खाली आली आहे.
➡️ राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर. 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर, मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 आणि 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आयोगामार्फत आता 290 पदांसाठी 17 संवर्गात भरती केली जाणार आहे
➡️ बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपयांत बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही
➡️ मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सादर केले 'यात्री अॅप'; मिळणार गाड्यांचे आगमन-प्रस्थान, वेळ, तांत्रिक विलंब, बिघाड अशी सर्व माहिती. या अॅपद्वारे स्थानिक प्रवाशांना लोकल ट्रेनची सर्व माहिती लाईव्ह व वेळेवर मिळू शकणार आहे.
➡️ सासऱ्याच्या संपत्तीमध्ये, इमारतीमध्ये जावयाचा कोणताही अधिकार नाही, एका खटल्यात केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय
➡️ जगभरात व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन; ट्विटर सुमारे सव्वा तास होते ठप्प; काल सोमवारी रात्री 9.30 वाजता व्हॉट्सॲपवर आला होता अडथळा
➡️ भूसंपादनासाठी एकरी 16 कोटी द्यावे लागले तर राज्यात रस्ते, विमानतळ होणे अशक्य - गडकरी; पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
➡️ भारतात पहिल्यांदाच लस पोहचवण्यासाठी ड्रोनचा वापर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा प्रयोग यशस्वी; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती
➡️ क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरण: शाहरुखचा मुलगा आर्यन खानसह तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत NCB ची कोठडी, त्यांचे वकील म्हणाले- तर खान साहेबांनी शीप खरेदी केली असती
➡️ आयपीएल 2021: प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 136 धावा केल्या; दिल्लीने 3 गडी व 2 चेंडू राखून चेन्नईचा केला पराभव; दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानी
➡️ भारतात 2,45,689 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,31,42,966 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,49,283 रुग्णांचा मृत्यू
➡️ पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता; प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचा अंदाज
➡️ पुणे-नाशिकला वाचविण्यासाठी नगरला लॉकडाऊन; भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचा आरोप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साधला निशाणा.
Bni salah transfer