लांजातील एका शाळेतिल स्वयंपाक घरात घुसला अस्सल नाग

लांजातील एका शाळेतिल स्वयंपाक घरात घुसला अस्सल नाग

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

अबब केवढा मोठा हा साप आणि तोही अस्सल नाग लांजा तालुक्यातील जावड़े जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 या मधील स्वयंपाक घरात काल 14 सप्टेंबर रोजी अस्सल नागाचे दर्शन झाले जवळच असलेल्या जंगल भागातून हा नाग आल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला गेला आहे हा साप दिसताच शाळेत सर्वांचीच घाबरगुंडी उडाली त्यानंतर सर्पमित्र सचिन जाधव आणि विठ्ठल बोगुलवार यांना बोलवण्यात आले

त्यानंतर काही क्षणातच या सापाला या सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून त्याच्या आदिवासात सोडले आहे हा नाग पूर्ण वाढीचा होता तसेच पाच ते साडेपाच फूट लांबीचा होता असे सांगण्यात आले सध्या ऊन पाऊस असे वातावरण असल्याने या काळात असे मोठे मोठे सर्प आश्रयासाठी येत असतात असे जाणकारांचे म्हणणे आहे