मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे कार व कंटेनर गाडी मध्ये अपघात
लांजा येथे झाला अपघात .....अपघातात दोन जखमी
मुंबई – गोवा महामार्गावरील लांजातील वेरळ मुस्लिम वाडी येथे कार व कंटेनर यांच्यात सकाळी 9.30 वाजता अपघात झाला. या अपघातात कंटेनर व कार मधील सर्व जखमी झाले आहेत
मुंबई ते कुडाळला जाणाऱ्या कारला गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. शंकर गंगाराम अनावकर (49), तृप्ती व्यंकटेश नरसुले (55, मुंबई) हे दोघेजण गंभीर जखमी असून कंटेनर चालक संजीवन कुमार (36) हाही जखमी आहे. असे तिघेजण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Bni salah transfer