संस्कृती फाउंडेशन लांजा आयोजित 'स्वरबहार' संगीत संध्येला लांजावासियांचा उत्तम प्रतिसाद

संस्कृती फाउंडेशन लांजा आयोजित 'स्वरबहार' संगीत संध्येला लांजावासियांचा उत्तम प्रतिसाद

रुबीन मुजावर

( कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज)

संस्कृती फाउंडेशन लांजा आयोजित 'स्वरबहार' संगीत संध्येला लांजावासियांचा उत्तम प्रतिसाद
भावगीते,भक्तिगीते,चित्रपटगीते मिमिक्री नृत्य यांची सुरेल संगीत संध्यासं सस्कृती फाउंडेशन लांजा आयोजित स्वरबहार दिवाळी संगीत संध्येला लांजावासियांनी भरभरून प्रतिसाद दिला.लांजा येथील श्री देव चव्हाटा मंदिरामध्ये सदर संगीतसंध्येचे आयोजन करण्यात आले होते.उत्तम नियोजन उत्तम सादरीकरण यामुळे जाणत्या रसिकांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

     

     कार्यक्रमाचे उदघाटन संस्कृती अध्यक्ष राजेश गोसावी उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे,गावकर विठोबा लांजेकर,बाबाशेठ लांजेकर,मुस्लिम वेलफेअर संघटना अध्यक्ष अखिल नाईक,ग्रामसेवक यूनियनचे सचिव सुबोध कीर, बांधकाम उप अभियंता विजय सोळगावकर,दादा बावधनकर, वीरशैव समाज अध्यक्ष मोहन तोडकरी,मार्गदर्शक विजय खवळे,अरबाज़ नेवरेकर,आदी  मान्यवरांच्या हस्ते झाले.
   यावेळी राजेश गोसावी लिखित व दिग्दर्शित 'मयुरी' या लघुपटाच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाची सुरवात आस्था खेडकर हिच्या सूर निरागस हो या नृत्याने झाली.यानंतर पंचतुंड ही नांदी सादर झाली.शैलेश शिंदे यांनी करूया उदो उदो अंबाबाईचा,मधुरा लाकडे रसिका तांबे यांनी आली माझ्या घरी ही दिवाळी,संदीप संसारे यांनी बीज अंकुरे अंकुरे,राजेश गोसावी यांनी आई माझी कोणाला पावली,रासिका तांबे यांनी खंडोबाची कारभारीन, रणजित झोरे यांनी जीना फाटलया, गुरु नांदगावकर राजेश गोसावी,रसिका तांबे करूया हृदयी वसंत फुलताना,रामदास चव्हाण यांनी पाहिले न मी तुला,रसिका तांबे यांनी नटले तुमच्यासाठी,मधुरा लाकडे,शुभांगी मुळे,रसिका तांबे,स्नेहल पांचाळ यांनी झुलवा पाळणा,अभय पाध्ये यांनी हरी म्हणा,अक्षय साखळकर यांनी कानडा राजा,वंश कुरूप याने दिवाळी गीत,गांधी यांनी मनाच्या धुंदीत अशी सुंदर गीते सादर केली.


    कुणाल पाटील मधुरा मीना यांनी बहारदार लावणी नृत्ये सादर केली मीना खेडकर आस्था खेडकर यांनी देखील अप्रतिम बहारदार नृत्ये सादर केली.तर महेशकुमार मयेकर व बालकलाकर वेदांत गोसावी यांच्या मिमिक्रीने रसिकांची मने जिंकली.योगेश शेट्ये यांनी उत्तम निवेदनाद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
     संगीतसाथ सिंथेसायजर राजू किल्लेकर, ढोलक ढोलकी केदार लिंगायत,पखवाज मंदार जाधव,ढोलकी कौस्तुभ सुतार, ऑक्टोप्याड सुयोग कांबळे,हार्मोनियम शंकर मुळे,ध्वनी व लाईट सौरभ कवचे यांनी पाहिली.
     शीतल डांगे व परेश दळी यांच्या रांगोळींने सर्वांना खुश केले.कार्यक्रमाला लोकमान्य वाचनालय लांजाचे माजी अध्यक्ष विजय नारकर, आकांक्षा प्रतिष्ठान अध्यक्ष गुरुप्रसाद देसाई,उपाध्यक्ष राजू धावणे, लांजा नागरी पतपेढी सहकारी संस्थेचे चेअरमन सचिन भिंगारडे, माघी गणेशोत्सव मंडळ लांजाचे संतोष खवळे, शिक्षक नेते दीपक नागवेकर,संगीत प्रेमी प्रदीप कांबळे,प्रशांत कापडी,गुरूदास शेट्ये,मापारी,नितीन गोसावी,सुनील अभ्यंकर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक राजेश गोसावी यांच्यासह अध्यक्ष गौतम कांबळे,उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे,संघटक प्रियवंदा जेधे,सिद्धेश पांचाळ,स्पर्धा प्रमुख राहुल तोडकरी,प्रसिद्धी प्रमुख दिनेश बेनकर,सचिव विनोद बेनकर,सदस्य पालवी गोठणकर,प्रजाप माने प्रकाश पांचाळ,रुपेश पांचाळ, संतोष शेट्ये,सचिन पांचाळ,श्रीकांत बोंबले,अभी गांधी आदिनी मेहनत घेतली.


      सलग 10 वर्षे अशा प्रकारचे सांगितिक उपक्रमाचे उत्तम आयोजन करून लांजा तालुक्यातील संस्कृतिक चळवळीला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे लांजा वासियांकडून कौतुक होते आहे.