राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचा २३ वा वर्धापन दिन शुक्रवारी १० जून रोजी लांजा येथे विविध कार्यक्रमांनी साजरा
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचा २३ वा वर्धापन दिन शुक्रवारी १० जून रोजी लांजा येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुरुवातीला पक्ष कार्यलया समोर पक्षाचे ध्वजारोहण जेष्ठ नेते शामराव पानवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पक्ष कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी झाडे जशी मोठी होतील त्याप्रमाणे तालुक्यात पक्षाची पाळेमुळे सर्वत्र पसरली पाहीजे.अशी कार्यकर्तांनी भावना व्यक्त केली.
यावेळी माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के, खजिनदार संजय खानविलकर, युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, शहर युवक अध्यक्ष दिपक शेट्ये, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष संजय कांबळे, दाजी गडहिरे, अनंत आयरे, अनिकेत कोपरे, किरण गुरव, शशिकांत बापार्डेकर, अरूण कदम, गुणवंत जाधव, व कार्यकर्ते उपस्थित होते.
Bni salah transfer