विजेचा लोळ घुसला घरात ..घरातील भिंत पोखरून विज गेली बाहेर ..बाल बाल बचावले माता पुत्र भयानक घटनेचा थरार
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
आकाशातून विजेचा लोळ सरळ घरात घुसला आणि घरातील भिंत पोखरून बाहेर गेला अशी भयानक घटना काल लांजा येथील बेनी खुर्द मध्ये घडली
गेल्या कित्येक दिवसापासून दुपारनंतर अवकाळी पावसाचा दणका लांजा तालुक्याला होत आहे त्यामध्ये आज बेनी खुर्द येथे एका घरावर वीज कोसळून घरातील इलेक्ट्रिक साहित्यांचा नुकसान झालं
या विजेचा लोड एवढा प्रचंड होता की या घरातील भिंत तोडून वीज घराच्या बाहेर गेली यावेळी या ठिकाणी असलेल्या एक महिला व त्याच्या बरोबर असलेलं मूल हे दोन्ही बाल बाल बचावलेत बेनी खुर्द येथील वसंत कदम यांच्या घरावर ही वीज कोसळली आहे त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका या कुटुंबाला झाला आहे याबाबत लांजा तहसीलदारांना लांजातील काँग्रेसचे नेते महेश सप्रे यांनी याबाबत माहिती दिली आज या ठिकाणी शासनातर्फे पंचनामा करण्यात येणार आहे
Bni salah transfer