रंगपंचमीच्या दिवशी वैभव खेडेकर यानी घातलेल्या कुर्त्याची जिल्ह्याभरात चर्चा
रंगपंचमीच्या दिवशी खेडमध्ये राजकीय शिमगा पाहायला मिळाला मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड चे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मंगळवारी खेडमध्ये रंगपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्हेरी गुड.... व्हेरी गुड ...सोमय्या आला का असा लिहिलेला कुरता घातला होता आणि हा कुर्ता एकच चर्चेचा विषय ठरला त्यामुळे शहरात रंगांची उधळण आणि राजकीय शिमगा देखील पाहायला मिळाला गेल्या काही दिवसा अगोदर शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा वेरी गुड ..वेरी गुड.. हा शब्द चर्चेत आला होता त्यांनी शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट ची माहिती भाजपचे किरीट सोमय्या यांना पुरवली असे आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि तात्कालीन खेड नगरीचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पुरावा दिला होता या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच घमासान उडाली होती या घटनेला आता चार ते पाच महिने उलटून गेले मात्र या घटनेची रंगपंचमीच्या दिवशी पुन्हा उजळणी झालेली पाहायला मिळाली ते म्हणजे खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी घातलेला तो कुर्ता एकच चर्चेचा विषय बनला होता
छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगपंचमी निमित्त लहान मुलांना रंगपंचमीसाठी पिचकारी आणि रंग वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर त्या ठिकाणी रंगपंचमी देखील मोठ्या थाटात आयोजित करण्यात आली होती त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी देखील झाली होती नेहमीप्रमाणे छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित हजारोंच्या संख्येने लोक होते मात्र हा कार्यक्रम सुरू असताना आज सर्वांच्या नजरा त्या मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी घातलेल्या कुर्त्यावर होत्या त्यामुळेच हा आता जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे
Bni salah transfer