रत्नागिरी जिल्ह्यातील रघुवीर घाट व रसाळगड दोन महिन्यांसाठी पर्यटनास बंदी
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
खेड तालुक्यातील रघुवीर घाट व रसाळगड ही दोन ठिकाणी कोकणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची आवडती ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून बनू लागली आहेत. गतवर्षीच्या अतिवृष्टीत या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यटनासाठी जाणे हे जीवावर बेतू शकते, ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत उपविभागीय अधिकारी यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून त्यांनी रसाळगड व रघुवीर घाट पर्यटनासाठी दि.१ जुलै २०२२ पासून पुढील दोन महीने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
या आदेशान्वये पावसाळी पर्यटनासाठी कोकणात येणार्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. परंतु, सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने उचलेल्या या पावलाचे स्वागत देखील पर्यटकांकडून करण्यात येत आहे.
प्रवेश बंदी असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून नाराजी.........
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्याने खेड तालुक्यातील खोपी व सातारा जिल्ह्यातील कंदाटी खोऱ्यातील गावांचा पावसाळी पर्यटनातून मिळणारा रोजगार हिरावणार आहे. तर रसाळगडवर देखील पर्यटकांसाठी प्रवेशबंदी असल्याने पर्यटक व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Bni salah transfer