जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी परशुराम घाटाची केली पाहणी
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
मुंबई - गोवा महामार्गावरील महत्त्वाचा समजला जाणारा परशुराम घाट पावसामुळे व दरड आणि माती ढासळत असल्याने सुरक्षितीतेसाठी प्रशासनाने वाहतुकीसाठी काही काळ घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पाहणी आज रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी केली
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सध्या घाटात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरड देखील कोसळत आहे. त्यामुळे घाट गेल्या ६ तारखेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. या धोकादायक बनलेल्या घाटाची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केली. यावेळी त्यांनी महत्वाच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण श्री. सचिन बारी, पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शिंदे, कल्याण टोलवेझ चे अधिकारी व अभियंते, इगल इन्फ्रा कंपनीचे अभियंते, उप विभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग श्री. प्रकाश निगडे, अभियंते श्री. मराठे, कनिष्ठ अभियंते श्री. पंडित तसेच संबंधित ठेकेदारांचे आदी कर्मचारी उपस्थित होते.
Bni salah transfer