जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी घालून दिला वेगळा आदर्श

जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी घालून दिला वेगळा आदर्श
अधिकारी संतोष जाधव , गौतम राऊत, अजय पवार, संभाजी ढेंबरे,प्रीती नार्वेकर, संगीता पालेकर,मृणालीनी शेळके,सिध्दी कोकरे, मानसी हातिस्कर,श्री शेंडे,श्री.पवार, उपस्थित होते

रत्नागिरी (प्रतिनिधि)
जिल्हा पुरवठा अधिकारी  श्रीम.रोहिणी रजपूत यांनी आपल्याच कार्यालयातील महसूल सहायक श्रीम. सोनाली अजय चव्हाण यांचा वाढदिवस सर्व सहाय्यक कर्मचारी यांचेसह कोणताही समारंभ न करता त्यांना रोख रकमेची मदत करून साजरा केला.
करोना काळात श्रीम.चव्हाण यांचे पती कै अजय चव्हाण  यांना कोरोना चा संसर्ग होऊन त्यात मृत्यु आला.
तरीही धीराने संसार चालवत असलेल्या श्रीमती सोनाली अजय चव्हाण यांना त्यांच्या वाढदिनी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून  संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी रोख रक्कम ११०००/- रुपये देवून त्यांचा वाढदिवस साजरा केला 
यापुढे प्रत्येक करोना मुळे निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना जमेल ती मदत करुन,काही ऐच्छिक रक्कम देवून त्यांचा किंवा आपला वाढदिवस साजरा करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी केले होते.त्यांस अनुसरुन सामाजिक   बांधिलकीत आपला खारीचा वाटा तरी असावा या भावनेने हा कार्यक्रम घेणेत आला.
या प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष जाधव , गौतम राऊत, अजय पवार, संभाजी ढेंबरे,प्रीती नार्वेकर, संगीता पालेकर,मृणालीनी शेळके,सिध्दी कोकरे, मानसी हातिस्कर,श्री शेंडे,श्री.पवार, उपस्थित होते.