महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती उत्साहात साजरी

मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रणित,महाराष्ट्र शासन आदेशान्वये,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रभानवल्ली येरडववाडी, तालुका लांजा,जिल्हा रत्नागिरी, या शाळेत राजमाता जिजाऊ ते सावित्रीमाई सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम जिजाऊ माँसाहेबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला.श्री.सरगर सर यांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या विषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जुबेर मोकाशी, उपाध्यक्ष नसरत कादीर हकीम, सदस्या गुलशन शेख,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बिलाल हकीम,नूतन सदस्य हशम शेख, सदस्या नसीम शेख, फातिमबी शेख,बदरून शेख,शमीम मोकाशी,अंगणवाडी ताई सौ.स्वरा पालांडे व वाडीतील अबालवृद्ध आदि मान्यवर तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी,शिक्षक उपस्थित होते,बिलाल हकीम यांनी लाडू वाटप केले. श्री.सरगर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.