लांजातील मुस्लिम वेलफेयर सोसायटी ने दोन दिवसापासून अडकलेल्या देवधे ते पाली सर्व वाहन चालकांना चहा नाश्ता बिसलरी बॉटल चे केले वाटप
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
मुस्लिम वेलफेयर सोसायटी ने अडकलेल्या देवधे ते पाली सर्व वाहन चालकांना वडा पाव बिस्कीट तसेच बिसलेरी पाणी बॉटल याचे वाटप केले..
अजणारी पूल येथे गॅस कंटेनर पुलाच्या खाली गेल्याने दीड दिवसापासून मुंबई गोव्याची वाहतूक ठप्प होती त्यामुळे प्रवाश्यांचे तसेच वाहन चालकांचे हाल होत होते ही बाब मुस्लिम वेलफेयर चे कार्य अध्यक्ष अकील नाईक यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचा विलंब न लावातच बिस्कीट पुढे, वडापाव, तसेच बिसलेरी पाणी बॉटल देवधे ते पाली पर्यंत जेवढे वाहन चालक व प्रवासी यांना वाटली आणि सतत चर्चेत असनारी मुस्लिम वेलफेयर सोसायटी यांचे भरभरून कौतुक केले तसेच मानंनिय पोलीस निरीक्षक श्री घटुकडे साहेब व अन्य पोलीस तसेच उरण वरून गॅस लिफ्ट करण्यासाठी आलेली टीम तसेच सेफ्टी डिपार्टमेंट ने पण मुस्लिम वेलफेयर सोसायटी चे भरभरून कौतुक केले.ह्या प्रसंगी मुस्लिम वेलफेयर चे अध्यक्ष रफिक शेठ नाईक कार्याध्यक्ष अकील भाई नाईक,उपाध्यक्ष ताज मोहम्मद मुजावर, युवा अध्यक्ष अकिब मुजावर, सैफ टोले व इतर सेवक उपस्थित होते
Bni salah transfer