लांजा व्यापारी संघटनेची बँक ऑफ इंडिया लांजा शाखा अधिकारी,जिल्हा पदाधिकारी यांची तक्रार निवारणपर समन्वय बैठक लांजा नागरी सहकारी पतसंस्था येथे पार पडली.

लांजा व्यापारी संघटनेची बँक ऑफ इंडिया लांजा शाखा अधिकारी,जिल्हा पदाधिकारी यांची तक्रार निवारणपर समन्वय बैठक लांजा नागरी सहकारी पतसंस्था येथे पार पडली.

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

बुधवार दिनांक ३ ऑगस्ट २०२२* रोजी व्यापारी संघटना पदाधिकारी,व्यापारी बंधू,पेन्शनर्स,सर्व प्रकारचे खातेदार,नागरिक आणि बँक ऑफ इंडिया लांजा शाखा अधिकारी,जिल्हा पदाधिकारी यांची तक्रार निवारणपर समन्वय बैठक लांजा नागरी सहकारी पतसंस्था येथे पार पडली.सदर बैठकीला *बँक ऑफ इंडिया जिल्हा झोनल मॅनेजर श्री.संतोष सावंतदेसाई साहेब,डेप्युटी झोनल मॅनेजर श्री.काळे साहेब,मुख्य प्रबंधक प्रमोद कुमार,वरिष्ठ सहाय्यक व युनियन लीडर संजय अडारकर* उपस्थित होते.

वरील सर्व *मान्यवरांचे* आणि *जिल्हा व्यापारी संघटना अध्यक्ष श्री.भाऊ वंजारे,व्यापारी तालुका संघटना उपाध्यक्ष श्री.राहुल शिंदे* या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.गेली दोन-तीन वर्षे बँक ऑफ इंडिया शाखा लांजा आणि सर्व प्रकारचे खातेदार या दोघांमध्ये प्रचंड असा दुरावा निर्माण झाला शिवाय खातेदारांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत होते.लांजा शाखेतून दुसऱ्या बँकेकडे बऱ्याच प्रमाणात खातेदार वळले त्याकडे शाखेचे लक्ष नव्हते तरी असे का घडले?याची थोडक्यात रुपरेषा म्हणा किंवा प्रस्तावना संघटनेचे *ज्येष्ठ सल्लागार श्री.महमदशेठ रखांगी* यांनी थोडक्यात विश्लेषण केली.

बैठक सुरू झाल्यावर *जिल्ह्यातील पहिली शाखा लांजा सारख्या छोट्या गावात* सुरू करण्यात आली हेही सांगण्यात आले आणि आज त्या शाखेबद्दलचे खातेदारांचे मत थोडसं नाराजीचे दिसून येत आहे अशातच आत्ताच नवीन रुजू झालेले लांजा शाखेचे मॅनेजर *श्री.प्रदीप लोहार साहेब* यांनी आल्याबरोबर थोडा अभ्यास केला आणि असं का घडले? यावर लागलीच त्यांनी *संघटना अध्यक्ष श्री.प्रसन्न शेट्ये व पदाधिकारी* यांना बोलावून या दुराव्यात काहीतरी सुवर्णमध्य काढण्यासाठी समन्वय बैठक आयोजन करावे अशी विनंती केली त्याप्रमाणे ही बैठक घेण्यात आली.

स्वागत व प्रस्तावना झाल्यावर *जिल्हा झोनल मॅनेजर श्री.संतोष सावंत देसाई साहेब* यांनी खातेदारांना झालेल्या या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि प्रथम आपला नंबर सर्वांना दिला आणि कोणतीही अडचण आल्यास मला केव्हाही फोन करा असे त्यांनी सांगितले.बैठकीचे चर्चासत्र प्रश्नांच्या भडीमाराने सुरु होते परंतु त्याला अगदी सहजपणे *श्री.सावंत देसाई साहेब* यांनी निराकरण करुन जे काही प्रश्न उपस्थित केले गेले त्या सर्व प्रश्नांची सत्वर नोंद सावंत साहेब स्वतः लिहून घेत होते तर काही प्रश्न तात्काळ बँक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून उत्तरे करीत होते.यापुढे तुम्हाला आमच्या बँकिंग सेवेत पूर्णपणे योग्य बदल झालेला व सक्षम कर्मचारी वर्ग दिसून येईल असे आश्वासन पर शब्दच दिला आहे.शिवाय लांजा शाखा ते झोनल कार्यालय येथपर्यंत कोणताही मराठी वरिष्ठ अधिकारी अजून किमान दोन तीन वर्षे बदलीही करणार नाही याची हमी दिली.*प्रश्नोत्तराच्या चर्चेत कॅशियरच्या उद्धट उत्तराची व व्यवहाराची चर्चा देखील झाली त्याबाबत सावंत साहेबांनी तातडीने दखल घेणार असे सांगितले.* आपल्यापैकी बरेच जणांना माहीत नसलेले बँक ऑफ इंडियाचे शेअर्स याविषयी चर्चा होताच या विषयासाठी एक स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात यावे असे देखील सांगितले जेणेकरून या शेअर्स विषयी सर्व माहिती आपल्या सर्व खातेदारांना मिळेल.आमचे ३०-४० वर्षांपूर्वीचे खातेदार आम्हाला सोडून दुसरीकडे गेले आहेत त्यांनी देखील आमच्याकडे पुन्हा यावे त्यांचे आमच्याकडे स्वागतच आहे आम्ही त्यांना वैयक्तिकरित्या पुन्हा भेटणारच आहोत.
सदरच्या बैठकीला ज्येष्ठ उद्योजक शिवाजीशेठ कोत्रे,लांजा नागरी पतसंस्था चेअरमन श्री.सचिन भिंगार्डे,प्रसिद्ध उद्योजक श्री.सुधीरशेठ भिंगार्डे,खरेदी विक्री संघ चेअरमन श्री.विजय नारकर,संघटना सल्लागार श्री.कुमारशेठ बेंडखळे,संघटना पदाधिकारी श्री.मंदार भिंगार्डे व श्री.प्रवीण शेट्ये,अमित साखरे,अभिजित डोर्ले,प्रसाद डोर्ले (नगरसेवक),ॲड.अभिजीत जेधे,प्रसाद भाईशेट्ये,समीर गांधी,दिनेश पटेल,किशोर पटेल आणि लांजातील मान्यवर व्यापारी बंधू उपस्थित होते.

*ज्येष्ठ नागरिक,पेन्शनर्स,कॅश क्रेडिट खातेदार,सर्वसाधारण खातेदार, नेटवर्क समस्या,एनईएफटी, आरटीजीएस,एटीएम,गॅलरी, कोणत्याही प्रकारचे कर्ज प्रकरण समस्या आणि इतर बँकिंग संबंधी समस्या* यावर सकारात्मक चर्चा होऊन जास्तीत जास्त सक्षम व योग्य पद्धतीने सेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगण्यात आले.तसेच महिना दोन महिन्यातून किमान एकदा खातेदार आणि शाखा अधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित करावी असेही त्यांनी सुचविले.

शेवटी *श्री.प्रदीप लोहार साहेब* यांनी सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व प्रकारचे खातेदार बंधू आणि लांजा नागरी सहकारी पतसंस्था यांचे आभार व धन्यवाद मानले आणि असे सांगितले की आपली काहीही अडचण समस्या असल्यास जिल्हा येथे साहेबांना फोन करण्याआधी मला आपली अडचण सांगा ती अडचण ताबडतोब सोडण्याचा आम्ही येथे प्रयत्न करू.

संघटना,सर्व व्यापारी बंधू आणि खातेदार यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकराबद्दल त्यांना धन्यवाद दिले.