राजापुरात बिबट्या घुसला घरात?.. घरात घुसण्याचे प्रमाण वाढले ?..कोकणात गावागावात बिबट्यांची दहशत वाढत चालली आहे
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
रत्नागिरी तालुक्यातील धामणसे गावात एका इसमाच्या पुड्यात बिबट्याने उड़ी घेतली हा प्रकार ताजा असतानाच राजापूर येथेही बिबट्या घरात घुसल्याने आता बिबट्यांचा वावर मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात होत असतानाच निदर्शनास आले आहे
राजापूर तालुक्यातील कुवेशी येथील तुळसुंदे वाडीत गुरुवारी 14 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास जुबेदा अन्वर खान यांच्या घरात अंदाजे 4 ते 5 महिन्याचा बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. हा बिबटा जुबेदा खान यांच्या घरात शिरला आणि जुबेदा खान यांच्यावर हल्ला करणार त्याचवेळी त्या ठिकाणी काशीनाथ जाधव आले. त्यानी आरडाओरडा केला. यावेळी बिबट्याला पळवून लावत असताना बिबट्याने जुबेदा खान यांना सोडून काशिनाथ जाधव यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात काशिनाथ जाधव यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. या बिबट्या सोबत मादी असण्याची शक्यता आहे. बिबट्याच्या वावरण्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या शिरल्याची माहिती कळतच सारे जमा झाले. त्यांनी बिबट्याला पिटाळून लावलं.
यापूर्वी असा प्रकार या विभागात सहा महिन्या पूर्वी बलवंत शिर्के यांचा बैल रानात चरण्याकरिता घेऊन गेले असता बिबट्याने मारला होता. त्यानंतर आठ दिवसात प्रभाकर लिंगायत यांची गाय वर बिबट्याने हल्ला चढविला होता. याची लेखी तक्रार वनविभागाकडे केली आहे.
मात्र मानवी वस्ती दिवसेंदिवेश बिबट्याचा वावर वाढत चालल्याने जंगलमे भागात राहणाऱ्या वाड्यान वस्त्यांमध्ये या बिबट्यांची दहशत वाढत चालली आहे त्यासाठी वन विभागाने वेळीच या बाबींकडे दुर्लक्ष न करता उपाययोजना करणे गरजेचे आहे
Bni salah transfer