राजापूर येथील खारलँड बंधाऱ्याची आमदार राजन साळवी यांच्याकडून पाहणी

राजापूर येथील खारलँड बंधाऱ्याची आमदार राजन साळवी यांच्याकडून पाहणी

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी केली राजापूर तालुक्यातील वैत्ये येथील खार लँडचा बंधाऱ्यांची पाहणी....

           काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी मुळे राजापूर तालुक्यातील वैत्ये येथील खार लँडचा बंधारा लिकेज झाल्याने समुद्राचे पाणी शेतात गेल्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यासंदर्भात आज शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी वैत्ये जाऊन बंधाऱ्यांची पाहणी केली. त्याप्रसंगी मा.सभापती अभिजीत तेली, शाखाप्रमुख राजू जाधव, सरपंच नंदिनी कदम, खारलँड अधिकारी सचिन चव्हाण, समीर मांजरेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.