मुंबई गोवा महामार्गावर नवीन कामाला भेग पडल्याने आश्चर्य
Kokan Live Digital News:
मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण हद्दीत कामथे घाटात रस्त्याला ला भेग गेली आहे. त्यामुळे येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे असे प्रशासनाने कळवले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कामथे हरेकरवाडी येथील जमीन खचली आणि काँक्रीटीकरणाला मोठी भेग पडली आहे. याची पाहणी अधिकाऱ्यांनी केल्यानंतर जुन्या डांबरी रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व ठेकेदार कंपनीच्या अधिकार्यांनी याची पाहणी केली. काँक्रिटीकरणाला तडे गेले असून या ठिकाणची माती खचली आहे.
Bni salah transfer