लांजा शहराच्या वाड्यांमध्ये होत आहे बिबट्याचे दर्शन
Kokan Live Digital News:
लांजा शहरातील कुंभार वाडी परिसरात काल रात्री अचानक पावणे नऊच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर बिबट्याचे दर्शन झाले या परिसरात मोठ्या संख्येने लोक राहत असल्यामुळे आणि बिबट्या खुलेआम फिरत असल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे
सोमवारी सायंकाळी पावणे नऊ वाजताच्या दरम्यान वासु रकर सर यांच्या घराकडून जलद गतीने धावत येत असलेला बिबट्या सर्वांनीच पाहिला हा बिबट्या सरळ येऊन मुंबई गोवा महामार्गावर थोडा वेळ थांबला व तो त्यानंतर शहनाई हॉल चा रस्त्या लगत तेथून तो गव्हाणे च्या दिशेने गेला त्यामुळे या परिसरात आता सायंकाळी खुलेआम फिरणे धोक्याचे झाले आहे याबाबत नगरसेवक राजू हळदणकर यांनी तहसील कार्यालय व वन विभागाला माहिती दिली आहे नगरसेवक राजू हळदणकर यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या गेल्या कित्येक दिवसापासून या परिसरात फिरत आहे संबंधित वन विभागाला याबाबत निवेदन देऊनही अद्यापि कोणतीही कारवाई न केल्याने त्या परिसरातील लोक बिबट्याच्या दहशतीत राहत आहेत तरी लवकरात लवकर संबंधित विभागाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अथवा या ठिकाणी पिंजरा लावून या बिबट्याला जंगलामध्ये सुरक्षित स्थळी शिफ्ट करावे असे लोकांचे म्हणणे आहे
Bni salah transfer