पावसाळ्यात आंबोली ला जाताय मात्र... त्या अगोदर हेच नक्कीच जाणून घ्या
कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज
कोकणात पावसाळा सुरु झाला की वर्षा सहलीसाठी सर्वांचंच डेस्टिनेशन असतं ते आंबोली घाट मात्र या आंबोली मध्ये आता पर्यटकांसाठी नवीन नियमावली जारी झाली आहे पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत दाखल होणार्या पर्यटकांना आता पार्किंग जागेतच गाड्या लावून पर्यटन स्थळावर चालतच जावे लागणार आहे. त्यासाठी रिक्षा किंवा अन्य गाड्यांचा पर्याय खुला आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.आंबोली चौकुळ आणि पारपोली या तीनही गावांची संयुक्त 10 रुपये करवसुली करण्यात येणार आहे, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी 120 पोलिसांची तुकडी तैनात करण्यात येणार असून स्थानिक तरुणांची मदत घेण्यात येणार आहे. तर दुसरीकडे अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. आंबोलीत शनिवार, रविवार 120 पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.आंबोली-चौकुळ रस्ता, महादेवगड रस्ता तसेच पार्किंग असणार्या ठिकाणी सर्व गाड्या पार्किंग करून धबधब्याकडे पाठवण्यात येणार आहे.आंबोलीतील रिक्षा तसेच परमिट असणार्या खाजगी गाड्यांसाठी दर ठरवून दिले जाणार आहेत. वाहतूक पोलीसांना मदतीसाठी स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. वीज कर्मचारी जादा देण्यासाठी सूचना करण्यात येणार आहेत. धिंगाणा घालणार्या पर्यटकांवर कारवाई होईल.एक नंबर देण्यात येणार असून धिंगाणा किंवा अनुचित प्रकाराबाबत फोन केल्यास तत्काळ पोलीस येणार आहेत. काही ठिकाणी सुरक्षासाठी रेलिंगची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
Bni salah transfer